Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Oct 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
‘या’ आठवडयात चांगल्या पावसाची शक्यता
राज्यातील मध्य, पूर्व व दक्षिणेकडील भागात या आठवडयात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकणातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण आठवडाभर काही भागात मेघ गर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्हयात काही दिवशी 30 ते 35 मिमी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, नांदेड या जिल्हयात काही दिवशी 14 मिमी, लातूर, नंदुरबार नगर जिल्हयात काही दिवशी 12 मिमी, नाशिक, धुळे, उस्मानाबाद, बीड या जिल्हयात काही दिवशी 10 मिली पावसाची शक्यता असून, जळगाव व परभणी जिल्हयात काही दिवशी 5 मिलीपर्यंत पाऊस होईन. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्हयात काही दिवशी 15 मिली पावसाची शक्यता असून, रायगड जिल्हयात 25 मिली व रत्नागिरी जिल्हयात काही दिवशी 35 मिलीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. आकाश अंशत: ढगाळ राहील. वाऱ्याचा वेग कमी असेल, आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहील. पूर्व,मध्य व पश्चिम विदर्भात अत्य अल्प पावसाची शक्यता असून, 7 ते 8 ऑक्टोबरला वाढ होणे शक्य आहे. मराठवाडयात वाऱ्याची दिशा इशान्येकडून असल्यामुळे या ठिकाणी ही पावसाचे प्रमाण वाढेल. कृषी सल्ला: 1. खरीपातील काढणीस आलेल्या पिकांची काढणी व मळणी ही पावसाची उघडीप असताना करून माल सुरक्षित स्थळी हलवावा. 2. ज्या ठिकाणी वाफसा स्थिती असेल, त्या ठिकाणी करडई, रब्बी ज्वारी, जवस, हरभरा या पिकांची पेरणी करावी. 3. पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
87
0