AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Mar 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली: किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान योजनेच्या नोंदणीसाठीचे बनावट संकेतस्थळ निर्माण करण्यात आल्याचे निदर्शनाला आले आहे. ही संकेतस्थळे शेतकऱ्यांची फसवणूक करत असून बनावट नोंदणी पोर्टलद्वारे मिळवलेल्या माहितीचा दुरुपयोग करत आहेत. यासंदर्भात संभाव्य लाभार्थीनीं संकेतस्थळावर नोंदणी शुल्क किंवा कोणतीही माहिती देऊ नये असे आवाहन नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने केले आहे. लाभार्थींनीं माहितीसाठी डिसकॉम अथवा नोडल एजन्सीशी संपर्क साधावा. संशयास्पद अथवा बनावट संकेतस्थळ निदर्शनाला आल्यास त्याची माहिती नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणी पद्धतीसंदर्भात मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टल www.mnre.gov.in ला भेट द्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.
सौर पंप आणि ग्रिडशी जोडलेल्या सौर पंप ऊर्जा सयंत्रासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या योजनेला ८ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता दिली. डिसकॉम आणि राज्य नोडल एजन्सी या योजनेची अंमलबजावणी करणार असून यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्वं लवकरच जारी करण्यात येणार आहेत. संदर्भ – कृषी जागरण, २५ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
217
1