Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Feb 18, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
विद्राव्य खतांचे फायदे
पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खते म्हणजे विद्राव्य खते होय. आजच्या काळात शेतकऱ्यांमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे प्रमाण पूर्वी पेक्षा जास्त वाढले आहे.कारण शेतकऱ्यांना विद्राव्य खतांचे महत्व समजले आहे म्हणून आपण पुढीलप्रमाणे विद्राव्य खतांचे फायदे समजून घेणार आहोत • पाण्यात विद्राव्य असल्यामुळे पिकांस लगेच उपलब्ध होतात . • पिकांना पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा नियमित होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते . • निर्यातक्षम गुणवत्तेचे चांगले उत्पादन होते • विद्राव्य खते पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येते. • विद्राव्य खते हि थेट पिकांच्या मुळाच्या कक्षेत दिली जातात त्यामुळे मुळांना त्वरित उपलब्ध होतात.
• विद्राव्य खते हि सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळांवर त्याचा दुष्परिणाम होत नाही • खते देण्याची पद्धत अतिशय सोपी व सोयीची असल्यामुळे मजूर खर्चात बचत होते . • हि खते रोज अथवा दिवसाआड कमी प्रमाणात दिली जात असल्यामुळे अन्नद्रव्य निचारावाटे वाया जात नाही. • आम्ल धर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रित करण्यास मदत करते.शिवाय ठिबक सिंचनात क्षार साचत नाही ड्रीपर चोक होत नाहीत. • विद्राव्य खते हि सोडीअम क्लोराईडसारख्या हानिकारक रसायनापासून मुक्त असल्यामुळे जमिनीच्या पोताचा रास होत नाही उत्पादनाची गुणवत्ता वाढते. • हलक्या जमिनीतही फर्टीगेशन द्वारे अधिक उत्पादन मिळवता येते. अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ८ फेब्रु १८
142
0