AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jun 19, 06:00 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जैविक शेतीचे महत्व
जैविक शेतीचा सगळ्यात मोठा फायदा कि मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून उत्पादन क्षमता वाढवणे रासायनिक घटकांचा वापर न करता फायदेशीर शेती करणे
• मातीमधील उत्पादन क्षमता वाढवून अनेक प्रकारची आपल्या शेतामध्ये पिके घेता येतात.
• जैविक शेतीचा प्रभाव जनावरांवर देखील होतो. कारण त्यामधून मिळणाऱ्या चारामध्ये रासायनिक घटक नसल्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगली राहून जनावरे निरोगी व सशक्त राहतात.
• जनावरांबरोबरच मनुष्यावर देखील त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. मनुष्याचे आरोग्य निरोगी व सशक्त राहते.
• जैविक शेती करताना सुरवातीच्या काळात थोड्या अडचणी येतात.पण नंतर च्या काळात उत्पादनात वाढ होऊन जैविक शेती फायद्यात येते.
संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!