Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Nov 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बासमती तांदळाची निर्यात १५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता
इरानवरून आयातची मागणी नसल्याने चालू वित्त वर्षात बासमती तांदूळ निर्यातीमध्ये १२ ते १५ टक्केपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम बासमती भात असणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे.
उत्पादन असलेल्या बाजारपेठेत पूसा बासमती भात १, १२१ च्या किंमतीत घट होऊन २,७५० ते २,८०० रू. प्रति क्विंटल आहे. जे की मागील वर्षी याची किंमत ३,१५० ते ३,२०० रू. प्रति क्विंटल होती. एपीडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय बासमती तांदळासाठी इरान सर्वात मोठा आयातकर्ता आहे. इरानमध्ये भारतीय निर्यातदारांना पूर्वी १,५०० करोड रूपये अडविले असल्याने निर्यातकपण नवीन सौदे करण्यास तयार नाही. चालू वित्त २०१९-२० च्या पहिल्या सहा महिन्यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान बासमती तांदळाची निर्यातीमध्ये ११.३३ टक्क्यांची कमी येऊन एकूण निर्यात १८.७० लाख टन झाले आहे, जे की मागील वर्षी समान कालावधीत याची निर्यात २०.८२ लाख टन झाले होते. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
134
0