Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्तादैनिक भास्कर
आता, मिरचीप्रमाणे टोमॅटो ही मिळणार तिखट!
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया या देशातील क्वीन्सलैंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीने असे केळे विकसित केले आहे की, ज्यामध्ये ‘ए’ व्हिटामीनचे प्रमाण सामान्य केळयापेक्षा दुप्पट असेल. ही केळी २०२५ पर्यंत बाजारपेठेत येणार आहे. एवढेच नाही तर, वैज्ञानिक हिरव्या मिरचीप्रमाणे तिखट लागणारे टोमॅटो ही विकसित करत आहे. या टोमॅटोमध्ये कैपसाईपिनोइड असेल, हे तत्वच मिरची तिखट बनवितात. ब्राझीलची फेडेरल यूनिवर्सिटी ऑफ विकोसाचे रिसर्चर अगस्टिन सोगोन सांगतात की, “कैपसाईपिनोइड हे वजन घटविण्यासाठी मदतशील असतात. मिरचीच्या तुलनेच टोमॅटो मोठया प्रमाणात उगविणे सोपे असतात. यावर ब्राझील व आयरलॅंड काम करत आहे. २०१९ च्या वर्ष अखेरपर्यंत टोमॅटो उगविले जाईल.” सफरचंदमध्ये एक मोठी समस्या आहे की, या फळाला कापल्यानंतर लवकर खाल्ले नाही तर त्यावर भुरी पडण्यास सुरूवात होते. कॅनाडाची कंपनी ओकानागन यांनी असे सफरचंद तयार केले आहे, जे कापल्यानंतर त्यावर भुरी पडणार नाही. संदर्भ – दैनिक भास्कर, ८ सप्टेंबर २०१९
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (आईएआरआई) चे अनुवांशिक विभागाचे प्रधान वैज्ञानिक डॉ. राजबीर यादव यांनी सांगितले की, गहूचे नवीन वाण एचडी-३,२२६ चे बियाणे शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पूसा कॅपसमधून मिळणार असून, ते चालू रबीमध्ये सीमित प्रमाणात उपलब्ध होणार आहे. हे बियाणे तयार करण्यासाठी ३५ ते ४० खासगी बीज कंपन्यांमधून एमओयू केले आहे. पुढील वर्षापर्यंत ही बियाणे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात मिळतील. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण इतर वाणांच्या तुलनेत ०.५० टक्के जास्त आहे. यामध्ये १२.८ टक्के प्रोटीन आहे, जे की दुसऱ्या वाणामध्ये अधिकतम १२.३ टक्के प्रोटीन असते. या वाणामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जास्त उत्पादनासाठी २० नोव्हेंबरच्या पहिले शेतकऱ्यांना या वाणाची लागवड केली पाहिजे. याचे सरासरी उत्पादन ५७.५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. याचे पीक १४२ दिवसांमध्ये तयार होतात. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
67
1