Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Nov 19, 06:30 PM
पशुपालनNDDB
पशुपालकांनी नोव्हेंबरमध्ये जनावरांसाठी ‘या’ बाबी लक्षात घ्याव्या
नोव्हेंबरमध्ये थंडीची सुरूवात होते, त्यामुळे पशुपालकांनी जनावरांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या महिन्यात अचानक कमी तापमान होत असल्याने जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्या.
• रात्रीच्या वेळी जनावरांना उघड्यावर बांधू नका. • जनावरांना बांधण्याची जागा कोरडी असावी. • लाळ्या खुरकत (Foot and Mouth Disease), घटसर्प (Haemorrhagic Septicaemia), शेळी/मेंढी देवी, ब्लॅक क्वार्टर इ. रोगांच्या लसी दिल्या नसल्यास, कृपया त्या वेळेत द्ये. • स्तनदाह रोगासाठी प्रतिबंधक उपाय करावा. • परजीवी औषधे किंवा द्रावण देऊन जनावरांना परजीवी उद्रेक होण्यापासून संरक्षण मिळेल. यामुळे परिणामी केवळ प्राण्यांचे आरोग्य सुधारत नाही, तर जनावरांनी खाल्लेल्या अन्नाचा उपयोग शरीरात होईल आणि दुधाचे उत्पादन देखील वाढेल. • प्राण्यांना योग्य प्रमाणात मीठ-मिश्रण द्यावे. • योग्य वेळी चारा खरेदी व साठवणुकीकडे पूर्ण लक्ष द्यावे. • विविध हंगामात येणाऱ्या चारा/गवताची कापणी करून साठवून ठेवावे. कारण यानंतर, ते फेब्रुवारी - मार्चमध्ये काढणीस उपलब्ध होते. • तीन वर्षांत एकदा मेंढी आणि बकरीला पी.पी.आर. ची लस दिली पाहिजे. • मेंढ्यांच्या शरीरावरील केस काढून टाकल्यानंतर २१ दिवसांनंतर बाह्य परजीवी टाळण्यासाठी जंतूनाशक द्रावणाने स्नान घालावे. संदर्भ :- एन.डी.डी.बी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
156
0