Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Dec 19, 03:00 PM
फळ प्रक्रियाएनएफबी
बटाटा वेफर्सचे तंत्रज्ञान
१) प्रथम मोठ्या व एकसारख्या आकाराचे निरोगी बटाटे निवडावे. २) बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. ३) बटाट्याची साल काढून १ मि. मी. जाडीच्या चकत्या स्लायसिंग मशीनद्वारे तयार कराव्यात. ४) त्यानंतर या चकत्या ५% मिठाच्या द्रावणात ५ मिनिटे बुडवून ठेवाव्यात. ५) त्यानंतर या चकत्या गरम पाण्यात (१०० अंश से.) १ - २ मिनिट बुडवून घ्याव्यात. ६) नंतर या चकत्या ०.२५% कॅल्शिअम क्लोराइडच्या द्रावणात बुडवून घ्याव्यात व चकत्या खाद्यतेलात तळून काढाव्यात व त्यावरती योग्य प्रमाणात मीठ आणि मसाला घोळून द्यावा. ७) तयार झालेले बटाटा वेफर्स पॉलिथिन पिशवीत हवाबंद कराव्यात. संदर्भ:- एनएफबी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
90
0