Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
कृषी खात्याचे ‘हे’ हक्क कायम
पुणे – राज्यात विविध ब्रॅंडखाली कीटकनाशकांच्या विक्रीला मनाई करता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिलेला असला तरी कायदयानुसार कामकाज होते की नाही हे तपासण्याचे कृषी खात्याचे हक्क कायम ठेवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळ कीटननाशक विषबाधा प्रकरणाची माहिती घेत असताना काही बोगस कंपन्या को-मार्केटिंगच्या नावाखाली कीटकनाशकांचे विविध ब्रॅंड बाजारात आणून शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असा निष्कर्ष राज्याच्या कृषी विभागाने काढला होता. त्यामुळे ब्रॅंडिंग व को-मार्केटिंगचा धुमाकूळ रोखण्यासाठी १२ डिसेंबर २०१७ मध्ये आदेश काढून मंत्रालयाने या पध्दतीवर बंदी आणली आहे. क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाने मात्र या आदेशाच्या विरोधात राज्य शासनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. “न्यायमूर्ती अकेली कुरेशी व एस.जे. काढवाला यांच्या खंडपीठाने या दाव्याची सुनावणी घेतली आहे. कृषी विभागाला ब्रॅंड विक्री प्रक्रियेवर प्रतिबंध आणण्याचा अधिकार नसल्याचेही न्यायालयने म्हटले आहे. मात्र याच आदेशात वेगळया ब्रॅंडने विक्री करताना कायदयातील तरतुदींचे पुरेपूर पालन झाले पाहिजे तसेच कायदयाचे पालन होते की नाही हे पाहण्याची मुभा कृषी विभागाला असल्याचेदेखील नमूद केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संदर्भ – अॅग्रोवन, १२ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0