Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार मिनी डाळमिल
नगर – कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यभरातील २५०० लाभार्थ्यांना मिनी डाळमिल व २५० लाभार्थ्यांना डाळमिलपूरक संचाचा लाभ मिळणार आहे. त्यावर सुमारे सव्वापाच कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. सर्वाधिक मिनी डाळमिल अमरावती जिल्हयाला मिळणार आहेत. ठाणे विभागात मात्र मिनी डाळमिल दिली जाणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांना शेतीसोबत अन्य पूरक व्यवसाय करता यावेत, यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ दिला जातो. या योजनेतून मिनी डाळमिल व पूरक संचाचाही लाभ दिला जात आहे. राज्यातील २५ जिल्हयांमध्ये यावर्षी २५० मिनी डाळमिल व २५० डाळमिलपूरक संचाचा लाभ दिला जाणार आहे. मिनी डाळमिलसाठी दीड लाखाचे तर पूरक संचासाठी ७५ हजारांचे प्रत्येकी अनुदान दिले जाणार आहे. डाळमिल अनुदान देण्यासाठी साधारणा सव्वापाच कोटी रूपये खर्च होणार आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, ९ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
0