Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यात ‘मी शेतकरी’ अभियान सुरू
नगर – शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी २ ऑक्टोबरपासून राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांचे ‘मी शेतकरी’ अभियान सुरू झाले आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी कायदा व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी गावांमधील पारावर, चावडीवर शेतकरी निवडणूक काळात ठिय्या देणार असून, प्रचारासाठी गावात येणाऱ्या शेतकरी विरोधी राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्नांबाबत जाब विचारणार आहे. नगर येथे भव्य शेतकरी रॅली काढून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावतीसह राज्यभरातील विविध जिल्हयांमध्ये जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन देऊन हे अभियान सुरू करण्यात आले असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितल. संदर्भ – अॅग्रोवन, ३ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
24
0