Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
माडग्याळ मेंढीचे होणार संवर्धन
मुंबई – राज्यांत मांसासाठी प्रसिध्द असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्हयातील ‘माडग्याळ’ गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढयांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात आहे. त्यामुळे माडग्याळचे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.
भारत वगळता इतर बहुतांश देशांमध्ये दैनंदिन आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते. आस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन आदि देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठा वाव आहे. त्यातच राज्यातील मेंढयांची संख्या सातत्याने घटत चालल्याने कत्तलीसाठी पुरेशा प्रमाणात मेंढया उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मेंढी मांसाच्या निर्यातीतही घट होत आहे. तसेच, राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदयाची अंमलबजावणी होत असल्याने बीफची उपलब्धता कमी होत आहे. ही कमतरता मेंढी मांसातून काही अंशी भरून काढता येऊ शकेल, असाही एक विचार आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ४ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
19
0