Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
खासगी साखर कारखान्यांची मागणी
पुणे – राज्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आग्रह खासगी साखर कारखान्यांनी धरला आहे. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. थकीत एफआऱपी आता केवळ पावणेदोन टक्क्यावर आली आहे.
साखर आयुक्तांच्या स्वाक्षरीने गाळपाचा परवाना दिला जातो. मात्र, सध्या आयुक्त शेखर गायकवाड हे हरियाना दौऱ्यावर आहेत. ते राज्यात आल्यानंतरच परवाना वाटप सुरू होईल. आतापर्यंत १६४ कारखान्यांनी अर्ज केलेले आहेत. मात्र, यातील बरेच अर्ज अर्धवट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे निश्चित किती कारखान्यांना बॉयलर पेटवण्यात रस आहे यांचा अंदाज आलेला नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाने १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. खासगी कारखान्यांना मात्र १ नोव्हेंबरपासून हंगाम पाहिजे आहे. यावर उपाय म्हणून १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संदर्भ - अॅग्रोवन, ३ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0