Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Oct 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
द्राक्षबागेवर स्पोडोप्टेरा लिटयूराचा हल्ला
नाशिक – जिल्हयात द्राक्ष पट्टयात सध्या द्राक्षबागांवर ‘स्पोडोप्टेरा लिटयूरा’ अळी मोठया प्रमाणात नुकसान करत आहे. नाशिक जिल्हयातील निफाड, दिंडोरी, बागलाण, चांदवड व नाशिक तालुक्यांमध्ये द्राक्ष क्षेत्र हजारो हेक्टर क्षेत्रावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे छाटणीपूर्व, छाटणीदरम्यान व छाटणीनंतर नवीन फुटींमध्ये, द्राक्षाच्या पोंगा अवस्थेमध्ये अळीने मोठे नुकसान होत आहे.
द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानंतर नव्याने तयार होऊन शेंडा, फूट, लहान पाने, पोंगा व तयार झालेले घड ही अळी खाऊन फस्त करत आहेत. या अळीने खाल्लेल्या वेलींच्या ठिकाणी नव्याने फळ येणार नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेस प्रादुर्भाव करून कोवळे डोळे-घड यांचे नुकसान करते. दिवसभर ही अळी जमिनीवर पालापाचोळा, गवत खोडाची साल यामध्ये लपून राहते. सध्या या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. मात्र रात्रीत वेगाने फैलाव होऊन पूर्ण झाडावर या अळयांचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे सध्या छाटणीनंतर फुटवे या अळया खात आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा छाटणी पुढे ढकलू लागले आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, १ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0