Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्तालोकमत
राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्प
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन(स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी २,१०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
जागतिक बॅंकेशी करार करून ७० टक्के निधी अल्पव्याज दरात प्राप्त होणार आहे. कृषीसंदर्भातील १३ योजनांचा लाभ एका क्लिकवर शेतकऱ्यांना मिळावा व थेट अनुदान वितरणात पारदर्शकता यावी यासाठी महा डीबीटी या प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी एकच अर्ज करावा लागेल. शेतकऱ्यांना अनुदान केवळ १५ दिवसांत मिळेल. आधार कार्ड व सात बारा यासोबत लिंक करण्यात येणार असून, योजना अंमलबजावणीत मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार आहे. संदर्भ – लोकमत, १० सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0