Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
डिजिटल शेती प्रशिक्षण प्रकल्प
परभणी: शेती क्षेत्रापुढे अनेक आव्‍हाने आहेत, आव्‍हानाचा सामना आपण विविध तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून करीत आहोत. भावी काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढणार आहे. ही बाब डोळयासमोर ठेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने परभणी कृषी विद्यापीठास डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्‍प पुढील तीन वर्षाकरिता मंजूर केला असून हा प्रकल्‍प देशातील एक उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र म्‍हणून विकसित व्‍हावा, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेतील प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. पी. के. घोष यांनी व्‍यक्‍त केले.
डॉ. पी. के. घोष पुढे म्‍हणाले की, सदरिल प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापक यांचे डिजिटल शेतीत मोठे योगदान ठरणार आहे. या प्रकल्‍पात डिजिटल शेती संबंधीत विविध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍था तसेच कंपन्‍या, उद्योजक यांचे जाळे तयार होण्‍यास मदत होणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ५ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0