Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
राज्यात होणार जैविक शेती मिशन
मुंबई: राज्यात जैविक शेती मिशन राबविण्यात येणार असून जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग होणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात जैविक मिशन बाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
हे जैविक शेती मिशन अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून २५ हजार हेक्टरवर १०-१० गावांचे क्लस्टर करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास १२ हजार शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. शेतकऱ्यांना लागवडीपासून, पॅकेजिंग, विपणन यांचे प्रशिक्षण देऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर किमान ३ वर्षे शेतकऱ्यांना याबाबत सहकार्य व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – कृषी जागरण, ४ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0