Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यातील चारा छावण्यांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
मुंबई – राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागातील पशुधनासाठी आवश्यक असणार चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न अजूनही कायम आहे. या दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मान्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. तसेच अदयापही मराठवाडा व इतर दुष्काळी जिल्हयांमध्ये अदयापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने यापूर्वी १ ऑगस्टपर्यंत व त्यानंतर ३० ऑगस्टपर्यंत चारा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ३१ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
0