Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पुरातील वाहून गेलेल्या पशुधानासाठी मिळणार इतकी मदत
मुंबई: पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या पशुधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा पशुधनाचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशुधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला स्पॉट पंचनामा, मदतीसाठी ग्राह्य घरण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. असा गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार 2,100 रुपये प्रती गोठा मदत देण्यात येईल. संदर्भ कृषी जागरण, २ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0