Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Sep 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
कोकणातील काजूला जीआय मानांकन देण्याची मागणी
रत्नागिरी – केरळच्या धर्तीवर राज्यात काजू बोर्ड स्थापन करावे, याशिवाय कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळावे, यासाठी जिल्हयातील काजू उदयोजक भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडे सातत्याने मागणी करत आहे. काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवा करण्याचे आश्वासन लाड यांनी शेतकऱ्यांना दिले. त्याचबरोबर काजू व्यावसाय़िकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याबरोबर बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ही लाड यांनी सांगितले. कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळाले, तर चांगला दर मिळू शकेल. सिंधुदुर्गातील काजूला मानांकन दिले गेले असले, तरीही ते फक्त मर्यादित आहे. संपूर्ण कोकणासाठी मिळणे गरजेचे आहे. ११० ते १२० रू. दर मिळाला पाहिजे, असे ही उत्पादकांनी सांगितले. संदर्भ – अॅग्रोवन, २९ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1
0