AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
आता, राज्यात साहिवाल प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्प
पुणे- राज्यातील साहिवाल गोवंशाचे संगोपन करणाऱ्या पुशपालकांना नोंदणीकृत जातीवंत वळूंची रेतमात्रा, सॉर्टेड सिमेन उपलब्ध करूण देण्याच्या बरोबरीने पशुपालकांच्या गोठयात जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन वाढविण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी व केंद्रीय गोवंश संशोधन संस्था, मेरठ यांच्या संयुक्त विदयापीठ राज्यात साहिवाल प्रक्षेत्र संतती परीक्षण प्रकल्पाला सुरूवात होत असल्याची माहिती पुणे कृषी महाविदयालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली. प्रकल्प केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की चार वर्षापूर्वी राज्यातील प्रयोगशील कृषी पदवीदार व पशुपालकांच्या सहकार्याने साहिवाल क्लब सुरू करण्यात आला. सध्या क्लबमध्ये १५० पशुपालक सहभागी असून, एक हजार साहिवाल गाईंचे संगोपन केले जाते. गटामध्ये सरासरी प्रतिदिन ८ ते १६ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या जातिवंत साहिवाल गाई आहेत. पशुपालकांच्या गोठयात जातिवंत उच्च दुधाळ वंशावळ तयार करण्यासाठी आम्हाला केंद्रीय गोवंश संशोधन संस्थेच्या माध्यमातून नोंदणीकृत जातीवंत वळूंच्या रेतमात्रा मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील पुशपालकांच्या गोठयात या प्रकल्पाच्या माध्यमातून जातिवंत, कालवडी गाई तयार होतील. प्रकल्पामध्ये सहयोगी शास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविदयालयातील डॉ. बाळासाहेब काम पाहतील. संदर्भ – अॅग्रोवन, ८ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0