AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्तालोकमत
पाहा, कांदा उत्पादकांसाठी ‘इतकी’ रक्कम मंजूर
सोलापूर – राज्यातील कांदा उत्पादकांची थकलेली ३८७ कोटी ३० लाख ३१ हजार रूपये इतकी रक्कम शासनाने मंजूर केली असून ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत. कांदा दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने २६ डिसेंबर २०१८ च्या आदेशान्वये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये व एका शेतकऱ्याला किमान २०० क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. बाजार समितीत कांदा विक्री झाली असेल तरच हे अनुदान दिले जाईल व हे अनुदान केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच दिले जाईल असे आदेशात नमूद केले होते. पहिल्या आदेशात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांदयाला अनुदान दिले जाईल असे सांगितले होते. त्यानंतर अनुदानासाठी मुदतवाढ देत २८ फेब्रुवारीपर्यंत विक्री झालेल्या कांदयाला अनुदान देण्याचा निर्णय झाला. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या १ लाख ६० हजार ६९७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ११४ कोटी ४८ लाख रूपये अनुदान वितरीत केले. संदर्भ – लोकमत, ९ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0