Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्तापुढारी
राज्यात ४०० हरितगृहे उभारणार
पुणे: केंद्राची राष्ट्रीय कृषीविकास योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून (एनएचएम) चालू आर्थिक वर्ष २०१९-२० साठी संरक्षित शेती या घटकाकरिता सुमारे १२० कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. आजवरचे हे सर्वाधिक अनुदान या घटकासाठी मिळाले आहे. त्यातून ४ हजार शेडनेट हाऊस व ४०० हरितगृहे उभारण्यात येणार आहेत. ज्यामुळे फूल पिके व भाजीपाली पिके घेण्यास शेतकऱ्यांचे अधिक प्राधान्य राहत असल्याची माहिती एनएचएमचे संचालक प्र. ना. पोकळे यांनी दिली. पोकळे म्हणाले, संरक्षित शेती घटकासाठी राज्यांतून सुमारे २८ हजार ७८४ शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यातून शेडनेट, हरितगृह व प्लास्टिक मल्चिंगसाठी आलेल्या अर्जांमधून सोडत काढून कामांसाठी १५ ऑगस्टपूर्वी पूर्वसंमती देण्याचे काम तालुका स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिक मल्चिंगमुळे पाण्याची बचत होते, त्यामुळे संरक्षित शेती घटकामध्ये त्यास महत्व असून, सुमारे एक कोटीचा निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संरक्षित शेती घटकामध्ये कामास पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विदयापीठे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयपीएचटी) मदतीने या विषयातील प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी प्रति शेतकरी पाच हजार रूपयांचा खर्च शासन करणार असल्याचे ही पोकळे यांनी सांगितले. संदर्भ – पुढारी, ५ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0