AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचे कोटीच्यावर अर्ज
पुणे: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढत असून, यंदा राज्यभरात शेतकऱ्यांकडून आलेल्या अर्जांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे. विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी आतापर्यंत ४४१ कोटी रूपये भरले आहेत. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत एकदा वाढवून दिली गेली होती. यानंतर ३१ जुलैच्या रात्रीपासून शेतकऱ्यांकडील अर्ज स्वीकारणी बंद करण्यात आली आहे. एकूण एक कोटी सात लाख २४ हजार ८५१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा अर्ज भरले. यात कर्जदारांचे अर्ज सहा लाख ८९ हजार ५७१ आहेत. यात अजून चार लाखाने वाढ अपेक्षित आहे. बिगर कर्जदारांचे अर्ज एक कोटी ३५ हजार २८० पर्यंत आलेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. संदर्भ: अॅग्रोवन, ३ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0