AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
आता, कृषी पर्यटनाला मिळणार चालना
मुंबई: मंत्रालयात कृषी पर्यटनासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना कशी मिळेल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले, या कृषी पर्यटनाला चालना मिळण्याच्या माध्यमातून पर्यटकांना गावाकडच्या नैसर्गिक वातावरणात राहून विविध हंगामातील फळे, भाज्या, अन्नधान्य, लोककला व शेती अशा पर्यावरणपूरक गोष्टींचा आनंद घेता येईल. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बोंडे म्हणाले, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना ताजी फळे, दूध, चुलीवरचा स्वयंपाक, हंगामी फळे, भाज्या, ग्रामीण भागातील लोककला व तेथील परंपरा जाणून घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त पर्यटनाच्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळेल. यासाठी काही निकष ठरविण्यात येणार असून त्यामध्ये स्थानिक शेतकरी, कृषी महाविद्यालये, गटशेती करणारे शेतकरी, महिला सहकारी संस्था यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ३१ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1
0