AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Aug 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
शेती पंप व सौर ऊर्जेबाबात शासनाचे धोरण
पुणे: यंदा एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची शासनाची योजना असून पुढच्या पाच वर्षात राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) चा ३५ वा वर्धापनदिन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, देशातील सर्वात जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र करतो. सन २०२४ पर्यंत १७५ गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी देशा समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील. गेल्या पाच वर्षात शासनाने राज्यातील वीज नसलेल्या १९ लाख कुटूंबियांना वीज देण्याचे काम केले आहे. संदर्भ – कृषी जागरण, ३१ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0