Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासन ५० हजार टन कादयांची साठवणूक करणार
नवी दिल्ली: कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कांदयाच्या किंमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन कांदयाची साठवणूक करण्यास सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आशियामध्ये कादयांची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे आहे. या बाजारपेठेतील किंमतीत २९ टक्के वाढ करून ती ११ प्रति किग्रॅने सुरू आहे. मागील वर्षी याच दरम्यान किंमती ८.५० रू. होते. उत्पादक क्षेत्रात दुष्काळी स्थितीमुळे, रबी कांदयाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कांदयाचा पुरवठा व किंमती या दोघांवर ही दबाव वाढू शकतो अशा माहिती खाद्य मंत्रालयाच्या एका आधिकाऱ्याने दिली आहे.
सहकारी संस्था नाफेडला मूल्य स्थिरता निधी या अंतर्गत कांदा खरेदी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत रबी हंगामात जवळजवळ ३२,००० टन कांदे खरेदी केले आहे. कांदया व्यतिरिक्त डाळवर्गीयसाठी १६.१५ लाख टन पुरवठा बनविला आहे. कांदयाचे एकूण उत्पादन ६० टक्के भाग रबी सीजनमध्ये होतो. संदर्भ- आउटलुक अॅग्रीकल्चर, ४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
28
0