AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Feb 19, 06:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य महाराष्ट्र
पुणे: भारत हा कृषी प्रधान देश असून देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, बागकाम, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, जल संरक्षणासह कृषी क्षेत्रात आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श राज्य बनविण्याचे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे केले.
कृषी व फलोत्पादन विभागाच्यावतीने सन 2015 व 2016 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यासागर राव म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतीचा विकास देशाच्या विकासाशी निगडीत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री कृषी सन्मान योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा शासनाचा मोठा निर्णय आहे. संदर्भ – कृषी जागरण, १५ फेब्रुवारी २०१९
1
2