AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Feb 19, 07:00 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सेंद्रीय कर्बामुळे होणारे फायदे
• जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. • जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते. • हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. • मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.
• रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते. • नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. • रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. • स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते. • जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते • सेंद्रीय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते. • जमिनीमध्ये जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेन्स
115
9