Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी बाजार विकासासाठी जर्मनी व भारतमध्ये करार
नवी दिल्ली – भारत व जर्मनीमध्ये देशामध्ये कृषी बाजारात विकासात सहयोगासाठी करार केला आहे, या दोन्ही देशात संयुक्त करारावर हस्ताक्षरदेखील केले आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, २०२२ पर्यंत कृषी व संबंधित क्षेत्रात सुधारित उत्पादकता, खर्च कमी करणे, स्पर्धात्मक बाजाराची उपलब्धता या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे ध्येय आहे.
या संयुक्त करारावर भारताचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर व जर्मनीचे कृषी अन् खादय मंत्री जुलिया क्लाकनर यांनी या करारावर हस्ताक्षरदेखील केले आहे. तोमर म्हणाले, निर्यात नीतीचे लक्ष्य २०२२ पर्यंत दुप्पट करून सहा करोड डॉलर करायचे आहे. जुलिया क्लाकनर यांनी सांगितले की, जर्मनी कृषी यांत्रिकीकरण व काढणीनंतरच्या व्यवस्थापनात आमच्याकडे कृषी तंज्ञ आहेत. जे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. या दोन्ही मंत्र्यानी कृषी यांत्रिकीकरण, काढणीनंतरचे व्यवस्थापन व शेतीशी संबंधित अनेक मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
666
0