कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बीटी कापसाच्या बियाणांच्या किंमतीत घट
शासनाने बीटी कापसाच्या बियाणांच्या विक्री किंमतीमध्ये घट केली आहे. ४५० ग्रॅम बीटी कापसाच्या पॅकेटची किंमत आता, ७३० रू. केली आहे.
केंद्र सरकारने बीटी कापूस बियाणांची विक्री किंमतीत घट केली असल्याने, याचा फायदा देशाच्या ८० लाख कापसाच्या शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनानुसार ४५० ग्रॅम बीटी कापूस (बॉलगार्ड -2) ची पॅकेटची किंमत कमी करून ७३० रुपये (रॉयल्टीमध्ये 20 रुपये समाविष्ट) करण्यात आली आहे. यामुळे यंदा खरीप पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना प्रति पॅकेटमागे १० रू. कमी द्यावे लागतील. २०१८-१९ च्या पीक हंगामात बीटी कापूस बियाणांची विक्री किंमत ७४० रू. प्रति पॅकेट होती, ज्यामध्ये ३९ रू. रॉयल्टी शुल्कचा समावेश होता. आता, चालू पिकाच्या हंगामासाठी रॉयल्टी ३९ रू. घट करून 20 रू. प्रति पॅकेट करण्यात आली आहे. याचा फायदा घरेलू बाजारपेठेतदेखील होणार आहे. संपर्क- आउटलुक अॅग्रीकल्चर, ११ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
101
0
संबंधित लेख