आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
एमएच टाटा मेट्री (मेट्रीब्युझिन 70% WP) (100 ग्रॅम)
100 gm
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
240330
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना:मेट्रीब्युझिन 70% WP
  • मात्रा:300-400 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत:पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती:मेट्रीब्युझिन अरुंद पाने आणि रुंद पाने असलेल्या दोन्ही प्रकारच्या तणांचे नियंत्रण करते.
  • सुसंगतता:कोणत्याही रसायनासह मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता:1 दा
  • पिकांना लागू:ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबिन आणि गहू.
  • विशेष टिप्पण्या:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती):मेट्रीब्युझिन तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यावर, दोन्ही वेळेला वापरता येते.
  • पिकाची अवस्था:१) सोयाबीन बियाणे उगवणीपूर्वी:- पेरणी झाल्यानंतर तातडीने व पिकास पाणी देण्यापूर्वी फवारणी करावी. उगवणीनंतर :- १-१५ दिवसांपर्यंत. २) ऊस बेणे उगवणीपूर्वी :- लागवडीनंतर ३ ते ५ दिवसांदरम्यान, उगवणीनंतर :- २०-२५ दिवसांपर्यंत. ३) वाटाणा लागवडीनंतर तातडीने ०-३ दिवस आणि १५-२० दिवसांपर्यंत. उगवणीपूर्वी :- पेरणीझाल्यानंतर तातडीने व पिकास पाणी देण्यापूर्वी फवारणी करावी आणि उगवणीनंतर ३-४ दिवसांनी.
  • महत्वपूर्ण माहिती:१- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा. २. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे. ३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा. ४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही. ५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी. ६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा. ७. वादळी व ​​पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका. ८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी. ९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे. १०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर *
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात. अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल