AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Aug 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात हवामान ढगाळ राहील
राज्यात या आठवडयात हवामान ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्रावरील व विदर्भावरील हवेचे दाब 1002 हेप्टापास्कल, तर मध्य महाराष्ट्रावर 1004 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. यामुळे कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासह तुरळक ठिकाणी या आठवडयात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत ईशान्य भारतावर हवेचे दाब वाढत नाहीत तसेच त्याचवेळी दक्षिण भारतातील हवेचे दाब कमी होत नाहीत, तोपर्यंत ईशान्य मान्सून अथवा परतीचा मान्सून सुरू होत नाही. सध्या नैऋत्य मान्सूनचा पाऊस सुरू असून तो यापुढे ही सुरूच राहील. कृषी सल्ला: 1.रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करावी. 2.करडईची पेरणी 15 सप्टेंबरपूर्वी करावी. 3.शेळीपालन व्यवसाय फायदयाचा 4.एकात्मिक कृषी व्यवस्थापन 5. गांढूळ खत निर्मिती करा 6. कुक्कुटपालनाची योग्य काळजी घ्यावी संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
40
0