Manish Pise
Maharashtra
13 Jul 19, 12:10 AM

Mazy Shetkari mitrano mala mazy shetat gandhul tayar karyche ahe mala tumche guidance pahije

0
0
2
0
टिप्पणियां (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
13 Jul 19, 07:01 PM

​नमस्कार पिसे सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे - उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. कदम

Manish Pise
Maharashtra
13 Jul 19, 02:47 PM

Thanks