नमस्कार कोणत्या प्रकारची फवारणी करावी. खत कोते व किती प्रकारचे कपाशीला ध्यावे

1
0
2
0
टिप्पणियां (2)
Ganesh Zarekar
Gangapur, Aurangabad, Maharashtra
01 Jul 20, 11:17 PM

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
02 Jul 20, 06:01 PM

नमस्कार रोकडे सर, आपल्या कापूस पिकामध्ये नागअळी + रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी आपण निम ऑइल घटक असणारे निंबीसिडीन @ 2 मिली प्रति लिटर सोबत असिटामॅप्रिड घटक असणारे माणिक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. सोबतच यापुढे आपल्याला रस शोषक कीड नियंत्रण होण्यासाठी आणि कीड प्रादुर्भाव तपासण्यासाठी पिवळे चिकट सापळे @ 5 प्रति एकर याप्रमाणे प्लॉट मध्ये लावावे. आपल्या कापूस पिकामध्ये अळी प्रादुर्भाव असून त्याच्या नियंत्रणासाठी २ दिवसांनी आपण इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे ईएम-1 @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावे. आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या वाढी साठी 24:24:0 @ 50 किलो प्रति एकर सोबत मॅग्नेशियम घटक असणारे मल्टिमॅग @ 10 किलो प्रति एकर एकत्र करून फोकून द्यावे. असेच भविष्यातही कपाशी तसेच इतर पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वेळोवेळी फोटो तसेच प्रश्न अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आपले अॅग्री डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद

0
0