क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
कृषि वार्ताकृषी जागरण
राज्यात ‘या’ ठिकाणी होणार सीताफळ हब
मुंबई: शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्हयातील खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी एका बैठकीमध्ये दिले.
सीताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाच्या रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरु शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात सीताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, असेही निर्देशदेखील डॉ. बोंडे यांनी दिले. संदर्भ – कृषी जागरण, १० जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
संबंधित लेख