क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jan 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
थंडीचे प्रमाण वाढेल
राज्यावर १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब अधिक राहिल्यामुळे या आठवडयात थंडीचे प्रमाण अधिक राहील. २७ जानेवारीला राज्यावरील १०१६ हेप्टापास्कल हवेचा दाब वाढल्यामुळे थंडीचे प्रमाण दिवसा, रात्री व पहाटे अधिक राहील, तसेच २८ जानेवारीला थंडीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होईल, मात्र उत्तरेकडील राज्यात व विदर्भात हवामान ढगाळ राहील.
कृषी सल्ला: १. उन्हाळी भुईमूग दुहेरी फायदयाचे पीक – भुईमूगाच्या मुळयावर रायझोबीयम जीवाणू गाठींच्या स्वरूपात हवेतील नत्राचे स्थिरीकरण केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. २. आंबा मोहराचे तुडतुडे किडी व भुरीपासून संरक्षण करावे. ३. ऊसाची लागवड १५ फ्रेबुवारीपूर्वी सुरू करावी. ४. भेंडी लागवड फायदयाची ठरेल. ५. फ्रेबुवारी महिन्यात काकडीची लागवड करावी. ६. उन्हाळी मिरची लागवड अधिक फायदयाची ठरेल. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डाॅ.रामचंद्र साबळे
82
9