क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
कृषि वार्तापुढारी
काजू उदयोगाला व्हॅट परतावा देणार
रत्नागिरी - काजू उदयोगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेण्याची तयारी केली आहे. कोकणातील काजू व प्रक्रिया उदयोगाला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करून आर्थिक अडचणीत असलेल्या या उदयोगाला चालना देण्याची सकारात्मकता शासनाने दाखविली आहे. कोकणात आंबा व्यवसायाबरोबरच काजू उदयोगात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काजूवर लादलेला व्हॅट परताव्याच्या स्वरूपात देऊन माफ करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे किचकट आर्थिक पिळवणुकीतून या व्यवसायाची मोकळीक होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना कर्ज माफी हा पर्याय दुय्यम असल्याने आता या उदयोगात सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. काजू
उत्पादक शेतकरी हे कोकणच्या अर्थकारणातील दुसरा मोठा स्त्रोत असल्याने याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा राज्यात काजू प्रक्रिया उदयोगात फेणीला प्रचंड मागणी आहे. संदर्भ – पुढारी, १४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
संबंधित लेख