Sorry, this article is unavailable in your chosen language.
कृषि वार्तापुढारी
‘या’ योजनेत कुटुंबप्रमुख शेतकऱ्यासह इतर एका सदस्याचाही समावेश
राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक व अन्य कारणांमुळे अचानकपणे जीव गमवावा लागतो, तर काही वेळा कायमस्वरूपी अंपगत्व येते. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेची व्याप्ती वाढविली आहे. कुटुंबप्रमुख शेतकऱ्यासह इतर एका सदस्याचाही या योजनेमध्ये समावेश केला आहे. यापुढे स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनत शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे आदि नैसर्गिक आपत्तींमुळे, तर अपघात, वाहन अपघात तसेच अन्य काही कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा कुटुंबातील कर्ता पुरूष अथवा स्त्रिया गेल्याने आर्थिक स्त्रोत बंद होतात, त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडते अशा कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून लाभ दिला जातो. संदर्भ – पुढारी, ७ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
1
Related Articles