Sorry, this article is unavailable in your chosen language.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोथिंबीर लागवडी विषयी महत्वाची माहिती!
• व्यापारीदृष्ट्या कोथिंबिरीची (धना ) लागवड सुधारित पद्धतीने करणे फायद्याचे ठरते. • या पिकास थंड हवामान मानवते. अति पर्जन्यमान व आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास कोथिंबिरीची वर्षभर लागवड करता येते. • लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करावी. • कोथिंबीर पेरणीसाठी ३ * २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. • कोथिंबिरीची पेरणी बी फोकून करतात किंवा २० सें.मी. अंतरावर रेषा पाडून बी पातळ पेरणी करता येते. • कोइमतूर- १, कोइमतूर- २, लाम सीएस- २, लाम सीएस- ४, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या जातींची निवड करावी. • बी पेरणी अगोदर धणे रगडून त्यांचे दोन भाग करावे. • धण्यासाठी पीक घ्यावयाचे असल्यास हेक्‍टरी १५ किलो बियाणे लागते. • कोथिंबिरीसाठी पीक घेताना हेक्‍टरी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते. • बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास बी लवकर म्हणजे दहा दिवसांत उगवते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
207
44
Related Articles