Sorry, this article is unavailable in your chosen language.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गुणवत्तापूर्ण कांद्याच्या उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
• सध्याच्या काळात कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कांदा पिकाच्या जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकात संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • कांद्याची झाडाची मुळे जमिनीत जास्त खोलवर जात नसल्यामुळे पिकास योग्य वेळी किंवा वरचेवर खते देणे गरजेचे आहे. • मुख्य अन्नद्रव्यामध्ये सुरुवातीच्या काळात पिकाच्या वाढीसाठी नत्रयुक्त खतांची गरज असते यामध्ये आपण युरिया, अमोनियम सल्फेट, 24:24:00 यांसारख्या नत्रयुक्त खतांचा वापर रोपांची लागवड केल्यानंतर पहिले 45 ते 60 दिवसांपर्यंतच करावा, उशिरा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम कांदा उत्पादनावर होतो. म्हणजेच कांदा साठवुणकीत सडणे, कांद्याला फुले म्हणजेच डेंगळे लागणे किंवा जोडकांदा तयार होणे यांसारख्या समस्या येतात. • कांदा पिकाच्या मुळीच्या आणि कंदाच्या विकासासाठी स्फुरदयुक्त खतांची आवश्यक्यता असते. यासाठी आपण सिंगल सुपर फॉस्फेट, 10:26:26 यांसारख्या खतांचा वापर सुरवातीलाच पहिली खतमात्रा देताना करावा. स्फुरद सोबत नत्रयुक्त खतांचा वापर करावा. जेणेकरून नत्रामुळे पिकास स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होते. • कांदा पिकातील तिखटपणा वाढवण्यासाठी, रंग सुधारण्यासाठी आणि कांद्याची टिकवणक्षमता सुधारण्यासाठी पिकास पालाश आणि गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते. पालाश साठी एमओपी, एसओपी,यांसारखी खते सुरुवातीला वापरावीत. • गंधक साठी कोसावेट सल्फर 90 %, बेनसल्फ यांसारखी उभ्या पिकात नत्रयुक्त खतांसोबत वापरावीत. गंधक मुळे कांद्याची गुणवत्ता तर सुधारतेच सोबतच इतर अन्नद्रव्यांची पिकास उपलब्धता करून देते. • पीक वाढीच्या अवस्थेत असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी विद्राव्ये खतांसोबत चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्येची फवारणी केल्यास पिकास जास्त फायदा होईल. • कांदा पिकात अन्नद्रव्येसोबतच पाणी व्यवस्थापन करावे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे फुलकिडे तसेच करपा रोगाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात. • वरील पद्धतीने पिकास अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून कीड रोग नियंत्रित ठेवले तर निश्चितच कांदा पिकाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
214
77
Related Articles