Sorry, this article is unavailable in your chosen language.
कृषि वार्तालोकमत
द्राक्ष निर्यातीसाठी बागा नोंदणीच्या मुदतीत वाढ
नाशिक – युरोपियन व इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नाशिक जिल्हयांतून द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.
निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीसाठी १४ ऑक्टोबर २०१९ पासून ग्रेपनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबपर्यंत होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांची नोंदणी कऱण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी प्रप्रत्र-१ मध्ये अर्ज, अर्जासोबत सातबारा उतारा याची प्रत व बागेचा नकाशा यांसह ५० रू. फी भरणे आवश्यक आहे. संदर्भ – लोकमत, २४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
Related Articles