Sorry, this article is unavailable in your chosen language.
कृषि वार्ताप्रभात
राज्यातील डाळिंब जाणार ऑस्ट्रेलियाला
पुणे: आंब्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातील डाळिंबदेखील ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेथील शासनाने नुकतेच याबाबत सकारात्मक अभिप्राय महाराष्ट्र शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे पुढील हंगामात डाळिंबाची निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात शेतीमाल निर्यातीचे नियम अत्यंत कडक आहे. कोणत्याही देशातून शेतीमाल आयात करताना ऑस्ट्रेलियन शासन त्याची पूर्ण तपासणी करते. यासाठी त्यांचा एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. भारतातून विशेषत: महाराष्ट्रातील हापूस आंबा गेले अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियात निर्यातीच्या प्रतिक्षेत होता. पण गेल्या दोन वर्षांपासून आता आंबा नियमित पाठविला जात आहे. ऑस्ट्रेलियाचे भारताशी आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध दृढ करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कृषी राजदूत जॉन साउथवेल यांनी नुकतीच
राज्य कृषी पण मंडळाच्या कार्यलयाला भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, “दहा विविध क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात व्यापार विकास वाढविण्यासाठी अभ्यास सुरू आहे. ऑस्ट्रेलियात डाळिंब आयात प्रक्रिया सुरू असून आमच्या देशातील प्रोटो कॉलनुसार आयात सुविधा केंद्र पण मंडळाने सुरू केले आहे. त्याची पाहणी गेल्या वर्षीच आमच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल सरकारला सादर केल्यानंतर डाळिंब आयात सुरू होईल. संदर्भ – प्रभात, ११ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0
Related Articles