Sorry, this article is unavailable in your chosen language.
कृषि वार्ताअॅग्रोवन
रब्बी कांद्याचे ३६ लाख टन उत्पादन
पुणे: रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. पोषक हवामानामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. पुणे विभागात रब्बी कांद्याचे जवळपास ३६ लाख ५२ हजार ९८० टन एवढे उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. उत्पादित झालेल्या कांद्याची साठवणूक करून टप्याटप्याने विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. पुणे विभागात रब्बी हंगामात एक लाख २१ हजार ७६६ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे.
पुणे विभागातील नगर जिल्हयात पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, नेवासा, नगर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ६०० हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १० हजार ७० हेक्टरवर लागवड झाली होती. शिरूर, खेड, बारामती, दौंड, आंबेगाव या तालुक्यातही बऱ्यापैकी कांदा लागवड झाली होती. सोलापूर जिल्हयातील बार्शी, मोहोळे, माढा या तालुक्यात बऱ्यापैकी कांदा लागवड झाली होती. करमाळा, पंढरपूर, सोगाला, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यात पाणीटंचाईमुळे कमी प्रमाणात लागवडी झाल्या होत्या. संदर्भ – अॅग्रोवन, १८ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
Related Articles