Sorry, this article is unavailable in your chosen language.
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Feb 19, 06:30 PM
पशुपालनअॅग्रोवन
जनावरांना होणाऱ्या लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणे
लिस्टेरिओसिस हा असा आजार आहे. जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो. पशुपालक, पशुवैद्यक, प्राणिसंग्रहालयात, प्राण्यांच्या दवाखान्यात, प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांना लिस्टेरिओसिस होण्याचे प्रमाण जास्त आहे. हा आजार प्रामुख्याने लिस्टेरिया मोनोसायटोजनेस (Listeria monocytogenes) नावाच्या जिवाणूमुळे होतो. लक्षणे: • सडकून ताप येणे (१०४ ते १०६ फॅरेनहाईट) • अशक्तपणा • असंतुलितपणा • स्नायू वेदना • मेंदूवर आघात होऊन झटके येतात
रोगाचा प्रसार: • निरोगी जनावरांचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांशी संबंध • गोठ्यातील अस्वच्छता • जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष • प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या द्रव्य पदार्थच्या म्हणजेच लाळ, रक्त, विष्टा, मूत्र, इ. च्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. • जिवाणू ने दूषित झालेले अन्न, पाणी, दूध, मांस किंवा त्याचे पदार्थ सेवन केल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो. • साठवलेल्या खाद्य (सायलेज फीड) सेवन केल्यामुळे जनावरांमध्ये रोग होऊ शकतो. प्रतिबंध व नियंत्रण: • आजारी जनावरे वेगळे करून त्यांच्यार योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी. आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे. • जनावरांची प्रयोगशाळेमध्ये लिस्टेरिया चाचणी करून आजार नसल्याची खात्री करून घ्यावी. • जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी. • गोठ्यात जनावरे बदलताना किंवा नवीन जनावरांची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. संदर्भ- डॉ. लीना धोटे, (अॅग्रोवन), १९ फेब्रुवारी २०१९
28
13