Sorry, this article is unavailable in your chosen language.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रेड अलर्ट; एकाच प्रकारच्या कीटकनाशकांचा वारंवार वापर करणे धोक्याचे !
• काही शेतकरी कीटकनाशकांचा पिकावर चांगला परिणाम (रिजल्ट) मिळाल्यास त्या औषधाची पुन्हा-पुन्हा फवारणी करतात. उदा. असिफेट + मोनोक्रोटोफॉस हे शेतकर्‍यांमध्ये फारच प्रचलित आहे कारण या औषधाच्या फवारण्यामुळे कापसाच्या झाडात हिरवेपणा येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना ते आवडत असले तरीही यामुळे बरेच प्रश्न निर्माण करतात. जसे झाडाचे आयुष्य वाढते तसेच गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचा देखील प्रादुर्भाव वाढतो. • एकच औषध वारंवार फवारणी केल्यास मित्रकिडी/परजीवी/ भक्षकांसाठी हे औषध सुरक्षित नसेल तर शेतातील अशा नैसर्गिक जीवांचा नाश होतो. • बर्‍याचदा एकाच प्रकारचे औषध काही पिकांमध्ये रोगांना कारणीभूत ठरते, उदा. कप्समध्ये सिंथेटिक पायरोथ्रॉइड्स (सायपरमेथ्रीन, फेनप्रोपेथ्रिन, पेरमेथ्रीन इत्यादीसारख्या औषधाच्या मागे “थ्रिन” आहे.) याच्या अत्यधिक वापरामुळे अल्टर्नेरिया रोग उद्भवतो. • एकाच घटकांची औषधाची सतत फवारणी केल्याने कीटकांच्या अनुवांशिक गुणधर्मांमध्ये बदल होतो, ज्यामुळे औषधाची प्रतिकारशक्ती विकसित होते आणि कालांतराने हे औषध कीटकविरूद्ध दुर्बल असल्याचे सिद्ध होते. • आपण वारंवार वापरत असलेली औषधे आणि जर ते पर्यावरणाला प्रदूषित करण्यासाठी मोठे योगदान देत असतील तर ते मोठे नुकसान करू शकते. • आपण वारंवार वापरत असलेले औषधांमुळे मधमाश्या सुरक्षित नसल्याने मधमाशांना नामशेष होण्यास आपणच जबाबदार आहोत. • आपण वापरत असलेले औषधांचा दुष्परिणाम होत असतील तर कालांतराने कोणत्याही गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकते. • जर आपण आपल्या आवडत्या औषधाचे प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यास आणि त्या औषधाचे अंश पीक उत्पादनामध्ये मुबलक असतील आणि जर आपण फवारणी आणि काढणी दरम्यान सुरक्षित अंतर राखत नसेल तर, आपण खरेदी केलेल्या भाज्या, फळे व धान्य यांवर दीर्घकाळापर्यंत औषधाचे अंश असतात यामुळे मानवी शरीरावर त्याचा दुष्परिणाम देखील होनाची शक्यता असते. • यामुळे पिकामध्ये शिफारशीनुसार, योग्य प्रमाणात व आवश्यकतेनुसार विविध औषधांची काळजीपूर्वक फवारणी करणे आवश्यक आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
160
41
Related Articles