Sorry, this article is unavailable in your chosen language.
कृषी वार्तालोकमत
पाहा,राज्यात मागील वर्षी किती पेरणी झाली?
पुणे: राज्यात रब्बी पिकाची पेरणी प्रगतीपथावर असून आत्तापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचा नुकतेच राज्याच्या कृषी विभागातर्फे ‘पीक पेरणी परिस्थितीचा’ अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यात २१ डिसेंबरपर्यंत रब्बी पिकाच्या एकूण ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तर राज्यात खरीप हंगामातील भात नाचणी,ज्वारी,भुईमुग पिकांची कापणी/काढणी अंतिम टप्प्यात आहे, तूर पीक शेंगा धरणे पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू असून कापूस पीक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहे,
तर वेचणी प्रगतीपथावर आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे,त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता ही कृषी विभागाने आपल्या अहवाल व्यक्त केली आहे. संदर्भ - लोकमत, २८ डिसेंबर २०१८
0
0
Related Articles